Importance of Astrology in life

साधारण पणे चाळीस ते बेचाळीस वयाची एक व्यक्ती  ऑफिस मध्ये थोडीशी गोंधळलेल्या  स्थितीत माझ्या समोर येऊन बसली. सर आपली आत्ताची भेटण्याची वेळ ठरली होती इत्यादी ….

माझ्या समोर बसत असताना मी त्या व्यक्तीस न्याहाळत होतो. काहीतरी गंभीर प्रश्न असून समोरील व्यक्ती अडचणीत आहे हे चेहऱ्यावरून जाणवत होते.

मला जन्म टिपण दिल्यावर, मला नोकरी नाही, माझी नोकरी गेली आहे.माझ्यावर दोन मुले आणि पत्नी ह्यांची जबाबदारी आहे  आणि आता नोकरी सुद्धा मिळत नाहीये. नोकरी मिळण्यासाठी काय करू? का एखादा व्यवसाय सुरू करू? पण व्यवसाय साठी कोणतेही भांडवल माझ्याकडे नाही. आता काय करू?

त्याचे प्रश्न सुरू असताना मी त्याची जन्म कुंडली प्रिंट आउट काढून नोकरी व्यवसायाच्या अनुषंगाने अवलोकन सुरू केले.

 जन्म कुंडली व महादशा  ह्यांचा विचार करून मी माझी काही अनुमाने तयार केली. त्या दृष्टीनं जातकाला आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या असे विचारले असता आत्ता पर्यंत मार्केटिंग मध्ये अनेक जॉब केले असून प्रत्येक जॉब मध्ये सिनियर्स व बॉस ह्यांच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली किंवा कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेली. असे सतत चालू आहे.

मार्केटिंग मध्ये काम करण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता जन्म कुंडली दर्शवत नव्हती. म्हणजे आतापर्यंत निवडलेले कार्यक्षेत्रच चुकीचे होते हे लक्षात येते.

असे अनेकांच्या बाबतीत घडत असते,दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजां साठी काही ना काही तरी केले जाते, त्यातून उदरनिर्वाह होतो पण योग्य ती प्रगती मात्र होत नाही.कुठे तरी परिस्थितीमुळे म्हणा अथवा कोणत्याही कारणाने काही तरी निर्णय घेतले जातात, आणि आता मागे हटल्यास, आपले कसे होईल ह्या भीतीने तसेच पुढे जातात काही काळ नंतर चूक कळते पण काळ पुढे गेलेला असतो. असो ….

जातकाच्या जन्म कुंडली चा विचार करून त्याला सर्व्हिस सेक्टर मधलाच एक व्यवसाय सुचवला ज्यासाठी भांडवलाची गरज नव्हती. मी सुचवलेल्या विषयात जातकाला आवड सुद्धा होती व हा व्यवसाय करावा असे अनेक वर्षा पासून त्याच्या मनात होते पण हिम्मत होत नव्हती.

सोने जमिनीत सापडते म्हणून कुठेही खणले तर  सापडत नाही, परंतु भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून विशिष्ट ठिकाणी खणल्यास सोने सापडण्याची शक्यता बळावते. अगदी तसेच आपले असते,योग्य दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल यशाच्या शिखरावर घेऊन जाते अन्यथा फक्त अंतर मागे टाकले  जात असते.

कुंडलीच्या योग्य विश्लेषणा द्वारे त्याच्या यशाचा मार्ग त्याला सापडला होता.

कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष मार्गदर्शना साठी संपर्क

Dr. Abhay Agaste

+91 9922445272  or  Send query on abhayagaste@gmail.com