गुरुपुष्यामृत योग

उद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्याच्या नावातच अमृत आहे असा हा शुभ योग. परंतु उद्या येनाऱ्या या योगाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे।

ज्योतिष शास्त्र दृष्टीने पुष्य नक्षत्रास नक्षत्राचा राजा असे म्हणतात, प्र्त्तेकाच्या कर्माचे माप न्याय बुद्धीने त्यांच्या पदरात टाकणाऱ्या शनी महाराजांचे हे नक्षत्र आहे. सागर मंथनाच्या वेळेस ह्याच नक्षत्रावर विष्णुस लक्ष्मी ची प्राप्ती झाली होती ह्या कारणाने अर्थार्जनासाठी ह्या नक्षत्रास महत्व आहे. विवाह सोडून सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हे नक्षत्र शुभ आहे, ह्या नक्षत्रावर सुरु केलेला व्यवसाय हा भरभराटीस येतो, व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते.

ज्या वेळेस चंद्र त्याच्या स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी जर गुरवार आला तर गुरुपुष्यामृत हा योग होतो, गुरु ग्रहाचा गुरुवार व शनीचे पुष्य नक्षत्र याच्या एकत्र येण्याने पुष्य नक्षत्राचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ह्या योगास महत्व आहे, ह्या दिवशी बारा वर्षा खालील मुलांना सुवर्णप्रश दिल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढून मुले सुदृढ होतात.

दि. 19/07/2012 रोजी सकाळी 10.30 ला चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो त्यामुळे सकाळी 10.30 पासून दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग होत आहे. तसेच संद्याकाळी 07.30 ला सूर्य सुद्धा पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असल्याने ह्या योगाचे महत्व आणखीनच वाढले आहे.

गुरुपुष्यामृत योगावर नवीन व्यवसाय, गुंतवणूक, वस्तू खरेदी तसेच सर्व प्रकारचे खरेदी व्यवहार करावेत. ह्या योगावर सुवर्ण खरेदी करणे शुभ असते. कारण ह्या योगावर खरेदी केलेले कायम स्वरूपी जवळ राहते असे मानले जाते 

पुढील गुरुपुष्यामृत योग – 16 /08/2012 रोजी सूर्योदयापासून संद्याकाळी 07.00 पर्यंत.